HW News Marathi
महाराष्ट्र

लढाऊ विमान उडवणारी पहिली भारयीत महिला

नवी दिल्ली | भारतीय हवाई दला फ्लाईँग ऑफिसर अवनी चतुर्वेदी तिने MIG – 21 हे लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या इतिहासाने सर्व महिलांच्या माना अभिमानाने उंचवल्या आहेत. १९ फेब्रुवारी सकाळी अवनीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण देखील केली. जुलै 2016मध्ये अवनी यांनी फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाल्या होत्या.

अवनी चतुर्वेदीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला तिचे वडिल दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. अवनीचा मोठा भाऊ लष्करात अधिकारी आहे. जगभरात असे निवडक देश आहेत जिथे महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारतात ऑक्टोबर२०१५ ला केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार

News Desk