HW News Marathi
महाराष्ट्र

आज भाजपची पहिली यादी जाहीर होणार ?

नवी दिल्ली । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची काल (३० सप्टेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पाडली आहे. या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज (३० सप्टेंबर) जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीत युतीच्या जागावाटपावर बैठक पार पडल्यानंतर अवघ्या तासाभरात शिवसेनेने जवळपास १४ उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. तर भाजपने विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. युतीच्या घोषणेआधी शिवसेनेने संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.

येत्या दोन दिवसात युतीची घोषणा होणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी (२८ सप्टेंबर) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितले होते. राज्यातील ६ विभागात ६ संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. संघटन मंत्री मुंबई – सुनील कर्जतकर, कोकण ठाणे – सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र – किशोर काळकर, मराठवाडा – भाऊराव देशमुख, विदर्भ – उपेंद्र कोठेकर, पश्चिम महाराष्ट्र – रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ही तर शरद पवारांची कॉंग्रेसला धमकी…”,नारायण राणेंचं खोचक वक्तव्य

News Desk

राज्यात कुठेही अन्नधान, फळ भाजीपालासह औषधांचा तुटवडा भासणार नाही, राज्य सरकारची माहिती

News Desk

एकनाथ खडसेंचा जमीन खरेदीत गैरव्यवहार!

News Desk