HW News Marathi
Covid-19

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून भिलईमधून राज्यात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल !

मुंबई । राज्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीरसह कोरोना लसीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, या सगळ्या चिंताजनक स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात दररोज ऑक्सिजन पुरवठा होण्यास प्रारंभ झाला आहे.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह तो साठवून ठेवण्यासाठी सिलेंडर्सचीही आवश्यकता असते. त्यासाठी देखील नितीन गडकरी यांनी व्यवस्था केली आहे. गडकरी यांच्याकडून १००० रिकाम्या सिलेंडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सिलेंडर्स रिकामे झाल्यानंतर ते पुन्हा भरून आणण्यासाठीदेखील तातडीने भिलई येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्यासमोर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ऑक्सिजन पुरवठ्याचा आहे. केंद्राकडून मदत घेऊन राज्य सरकारला ह्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे, येत्या काळात ही समस्या दूर होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची औषधं आणि लसीवर GST कर गरजेचा, नाहीतर किंमत वाढेल- निर्मला सीतारामन

News Desk

ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी ७ जानेवारीपर्यंत कायम

News Desk

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी  ऊर्जामंत्र्यांची दहा हजार कोटींची मागणी

News Desk