HW News Marathi
महाराष्ट्र

आधी शिवरायांचा अपमान,आता श्रीपाद छिंदमचा नवा कारनामा!

अहमदनगर। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला एका ज्युस सेंटर चालकास जातीवाचक शिवीगाळ केल्याने अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांनाही तोफखाना पोलिसांनी अटक केली. ज्युस चालकाला शिविगाळ केल्याचं प्रकऱण कोर्टात पोहचलं होतं, जिथं छिंदम आणि त्याच्या भावाने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमसह त्याच्या भावाला बेड्या ठोकल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं होत

अहमदनगरचा उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने मनपा अधिकाऱ्याला फोनवरुन शिविगाळ केली होती. या दरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं. ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर श्रीपाद छिंदम हा फरार झाला. या काळात छिंदमच्या घरावर दगडफेकही झाली होती. मात्र, एवढं होऊनही श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा मनपा निवडणुकीला उभा राहिला आणि एवढ्या वाईट पातळीचं कृत्य करुनही त्याचा त्या निवडणुकीत विजयही झाला. मनपा निवडणुकीतील विजयानंतर श्रीपाद छिंदमने पश्चाताप केल्याचं दाखवलं, छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेसमोर त्याने माफी मागितली. हेच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत बसपा त्याला तिकीट दिलं आणि त्याने दणदणीत प्रचारही केला. मात्र, मतदारांनी त्याला नाकारल्यानं त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

एकंदरीतच काय आहे प्रकरण?

9 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 दरम्यानची घटना. दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी महापौर श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यानंतर ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.त्यातील दोघांना सशर्त जामीन मिळाला, मात्र श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात’ – जितेंद्र आव्हाड

News Desk

‘तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार’, छगन भुजबळांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

News Desk

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk