HW Marathi
कोरोना देश / विदेश पुणे महाराष्ट्र

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

पुणे | कोरोनाचं संकट आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक सर्व स्तरांतुन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आता एक अत्यंत दिलासादायक बातमी पुण्यातुन आली आहे. महाराष्ट्रातली पहिले दोन कोरोनाबाधीत आता पुर्णपणे बरे झाले असून त्यांची टेस्ट निगोटिव्ह आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळले होते. हे दोघी रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते. त्यांना 6 मार्चपर्यंत कोणतेही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, 9 मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते.

या दाम्पत्यावर 13 ते 14 दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. या दोनेही रूग्णांच्यारक्त तपासणीत कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या दाम्प्त्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या मुलीवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचीदेखील प्रकृती स्थिर आहे. मात्र, अद्याप तिच्या रक्त तपासणीचं रिपोर्ट आलेलं नाही.

 

 

Related posts

महिला तहसीलदाराचा ‘हिरोईन’ म्हणून उल्लेख, बबनराव लोणीकरांचे बेताल वक्तव्य

अपर्णा गोतपागर

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘या’ कारणांमुळे सोडले घर

News Desk

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

News Desk