HW Marathi
महाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणुक 2019

छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदारासह ५ जवान शहीद

रायपूर | आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून उपद्रव सुरु झाला आहे. छत्तीसगढमधील दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांकडून भीषण हल्ला घडवून आणण्यात आला आहे. भाजप आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्यातील एका वाहनाला लक्ष्य करत नक्षलवाद्यांनी घडविलेल्या आयईडी स्फोटात ५ जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. तर आमदार भीमा मांडावी यांचा देखील जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजप आमदार हे ताफ्यातील सर्वात शेवटच्या वाहनात बसले होते. छत्तीसगढमधील दंतेवाडा येथील श्यामगिरी परिसरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात २ वाहनांचे नुकसान झाले. एका वाहनातील ५ जवान गंभीर जखमी झाले तर दुसऱ्या वाहनात असणारे भाजप आमदार आणि ५ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी या स्फोटानंतर गोळीबार करायला सुरुवात केली. घटनासथळी सीआरपीएफ जवानांचे रेस्क्यू पथक दाखल झाले.

Related posts

युतीसाठी शिवसेनेने सुचविलेला १९९५चा फॉर्म्युला भाजपला मान्य होणार ?

News Desk

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

News Desk

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk