HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पूरग्रस्त गावे ४-५ दिवसांत चकाचक होतील !

मुंबई | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्याची सांगली- कोल्हापूरची पूरपरिस्थिती आणि सरकारकडून होणार्या उपाययोजना यासंबंधीची  माहिती दिली. “शेकडो वर्षात झाला नाही इतका पाऊस यंदा काही दिवसात पडला. त्यामुळे नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे”, असं गिरीश महाजन  म्हणाले.

त्याचपद्धतीने “मनुष्यबळ कितीही प्रमाणात लागू दे, गावं ५ ते ६ दिवसात चकाचक झाली पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत”, असे सुद्धा त्यांनी सांगितलं. “सध्या आमचं लक्ष्य आरोग्य यंत्रणेकडे आहे. पुरामुळे घाण रस्त्यावर आली आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वकाही पूर्वपदावर आणू”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“पुरात नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणासाठी तलाठ्यांना पाचारण करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.  वीज-आरोग्य आणि पाणी यासारख्या सुविधा देण्यास प्राधान्य आहे. युद्धपातळीवर काम सुरु आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. “सांगलीमध्ये पाणीपातळी 57.5 इंचांवर गेली होती, सध्या 50.5 इंचांवर आहे, 40 फुटापर्यंत इशारा पातळी आहे. दोन दिवसांत पूर ओसरुन पूर्ववत होईल”, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Related posts

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त आहे ? | जयंतराव पाटील

महत्त्वाच्या शासकीय संस्थांना सुरक्षा पुरवा

News Desk

गोदापार्कचा पॅटर्न पुण्यात राबवण्याचा राज यांचा मनोदय

News Desk