मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळाचा शिक्षणावर प्रचंड परिणाम झाला. शैक्षणिक वर्ष कधी सुरु करावे यावर संभ्रम निर्माण झाला होता. अशातच शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करता येईल का, याबाबत राज्य शासन केंद्राशी विचारविनिमय करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल (२० ऑगस्ट) बैठक झाली होती. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही या बैठकीत चर्चा झाली.
CM Uddhav Balasaheb Thackeray in a meeting to discuss the new National Education Policy, instructed to appoint a committee consisting of education experts and practitioners to systematically approach the implementation of the National Education Policy in the state.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 20, 2020
सध्याच्या स्थितीत काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन किंवा जसे शक्य होईल तसे शिक्षण पोहोचले पाहिजेच. शिक्षण विभागाने यातील सर्व उणिवा, अडथळे दूर करावेत, शिक्षकांची उपस्थिती तपासावी. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत त्या तात्काळ पाहाव्यात, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेशही या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यातील शाळा बंद शिक्षण सुरूचा आढावा तसेच नवीन शालेय #शिक्षणधोरणाच्या पूर्वतयारीबाबत आज #वर्षा निवासस्थानी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी @CMOMaharashtra @Subhash_Desai @samant_uday @AUThackeray
आणि संबंधीत अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/ahqoe9XgJ7— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 20, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.