HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी होणार अटक

मुंबई | मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. आता नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नरेंद्र मेहता यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याच शक्यता वर्तवली जात आहे.

या महिलेने कोकण महानिरीक्षकांकडे मेहता यांची तक्रारही केली होती. या तक्ररीनंतर मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पीडित नगरसेविकेने नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची माहितीही पोलिसांना दिली.

पीडित नगरसेविकेने नरेंद्र मेहता यांच्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचे त्यांचे म्हणणे होते. पक्षाकडून न्याय न मिळल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनेही विधिमंडळात भाजपला घेरले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वत: हा मुद्दा उचलला होता. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी सेटलमेंट केली तर महाराष्ट्राचे डीजीपी माझ्या विरोधातील…” परमबीर सिंगांचा आरोप

News Desk

‘युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे पडलं महागात’, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल!

News Desk

समाज हादरुन गेलाय’, चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी!

News Desk