HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई | माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह विकोपाला गेल्याचे दिसून येते आहेत. नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. “विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत”, असे बाळासाहेब थोरात यांनी वाढदिवसानिमित्ताने शिंदे शाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्षांकडे पाठविल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन जनतेशी संवाद साधताना म्हणाले. आणि बाळासाहेबांनी तेव्हाच विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळत आहे.बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली हायकमांड कोणता निर्णय घेईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

सत्यजीत तांबेंची नाना पटोलेंवर नाराजी

नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांनी उदमेवारी अर्ज दाखल केला नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी देखील झाले. या पत्रकार परिषदेतून सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

राजकारण झाले ते मला व्यथित करणारे 

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आणखी एक राजकारण मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झाले, सत्यजीत खूप चांगल्या मताने विजयी झाला. याचेही अभिनंदन यानिमित्ताने आपण करत आहोत. फक्त, जे राजकारण झाले ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तू स्थिती आहे. याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे कधी बाहेर फार बोलले नाही पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून याबाबती काय जे आहे. मी पक्षश्रेष्ठींना कळविलेले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचे आहे ते योग्य पद्धतीने करू. याबाबतीत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. काही बातम्या अशा आल्या की, पार आपल्याला भाजपपर्यंत नेहून बोचविले. ऐवढेच नव्हे तर भाजपच्या तिकटाचे वाटप देखील करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिले असेल, अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडून आलेल्या असल्या तर काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचाराने पुढील वाटचाल. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने राहणार आहे. याची ग्वाही आपण देतोय.”

संबंधित बातम्या

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

 

 

Related posts

भाजपच्या १२ आमदारांबाबतच्या निकालावर उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटर वॉर

News Desk

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेचे अविनाश जाधव आक्रमक!

News Desk

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk