HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसला धक्का, माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन

रायगड | महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केलं.

 

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले . आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड त्यांच्या निवास स्थानावरून निघणार आहे. काँग्रेसकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? भाजपचा सेनेला सवाल 

News Desk

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

News Desk

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk