मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मात्र आता पुन्हा ईडीची कारवाई सत्र सुरु झालं आहे. ईडीने आता शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना मोठा दणका दिला आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडीने 234 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. विवेक पाटील बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.
ED has attached immovable properties worth Rs 234 Cr of Vivekanand Shankar Patil, 4-time MLA & Ex-Chairman of Karnala Nagari Sahakari Bank Ltd, in a bank fraud case. The attached properties include Karnala Sports Academy & many land parcels: Enforcement Directorate pic.twitter.com/Ql9JloMnq9
— ANI (@ANI) August 17, 2021
६३ बोगस खात्यांतून पैशांची अफरातफर
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर २०१९ मध्ये ईडीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी जवळपास ६३ बोगस खात्यांतून पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या खात्यात कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे वळवण्यात आल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनात आले आहे.
अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते. पनवेल संघर्ष समितीने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.