HW News Marathi
महाराष्ट्र

‘वंचित बहुजन आघाडी’च्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई। महाराष्ट्राच्या निसर्ग चक्रीवादळ धोका आहे. तर दुसरीकडे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार बळीराम शिरस्ता आणि हरिदास पदे यांनी आज (३ जून) राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बळीराम शिरस्कर हे वंचितच्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. राहुल डोंगरे हेसुद्धा कोणे एके काळी ईशान्य मुंबईत वंचितचे नेतृत्व करत होते. काही महिन्यांपूर्वी डोंगरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा हातात घड्याळ बांधले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…!

News Desk

महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील

News Desk

उदय सामंतांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत भेट, निलेश राणेंचा गौप्यस्फोट

News Desk