HW News Marathi
महाराष्ट्र

गोपिनाथ मुंडेंच्या रुपाने दिलदार विरोधीपक्षनेता महाराष्ट्राला लाभला,अजित पवारांनी केलं अभिवादन

मुंबई | आज भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. भाजपच्या नेत्या आणि गोपिनाथजींच्या कन्या पंकजा मुंडे यांनी घरी कुटुंबासमवेत मुंडे साहेबांना श्रद्धांजली वाहिली तर प्रीतम मुंडेंनी गोपीनाथगडावर जाऊन आशिर्वाद घेतले. धनंजय मुंडेंनीसुद्धा गोपीनाथगडावर जाऊन अभिवादन केले .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा गोपिनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली असून त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील सामान्य जनता, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!त्यांच्या रूपानं संघर्षशील लोकनेता,दिलदार विरोधी पक्षनेता राज्याला लाभला.संघर्षनायकाला विनम्र अभिवादन! अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

News Desk

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

News Desk