HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांकडून अटक

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे. खार पोलिसांनी महाडेश्वरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हाजी आलम खान, दिनेश कुबल आणि शेखर वांगणकर या तीन माजी नगरसेवकांना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आमदार रवी राणा आणि त्यांची पत्न खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात येत आहे. 

राणा दाम्पत्याना भेटण्यासाठी सोमय्या हे २३ एप्रिल रोजी सायंकाळी खास पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी सोमय्याच्या गाडीवर शिवसैनिकांनी चप्पल आणि दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणात सोमय्याच्या गाडीची काच फटली असून सोमय्या जखमी झाले होते. सोमय्यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात जीवे मारण्याचा प्रयत्न केला एफआयआर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. यानंतर ही एफआयआर वांद्रे पोलिसांकडून खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. खार पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांनी महाडेश्वरांना अटक केली. 

किरीट सोमय्यांनी एफआयआरमध्ये नेमके काय म्हटले

“शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात एआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु, पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. पण पोलिसांनी माझ्याविरोधात बोगस एफआयआर दाखल केली. मला जिवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. याआधी वाशीम, पुणे आणि आता मुंबई मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस असताना ५० ते १०० शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी माझी एफआयआर दाखल केली पण यात कुठून तरी दगड आल्याचा म्हटले आहे, अशी माहिती सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊत यांनी कोविड पेशंटचे काय होणार? असा प्रश्न विचारला असता तर आनंद झाला असता – फडणवीस

News Desk

कोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? सचिन सावंत

News Desk

मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

Aprna