HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं आज निलंबन?

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे राज्याच्या राजकारणात वारंवार चर्चेचा विषय ठरतात. नुकतच परमबिर सिंह आणि सचिन वाझे या दोघांमध्ये संबंध सुरू मध्ये जवळपास एक तास चर्चा झाली होती. आणि ही चर्चा अनधिकृत मानत सरकारच्या अडचणीत वाढ करणारी होती. मात्र असं जरी असलं तरी देखील आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली

आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाई असं सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.

पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश

परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोघांमध्ये चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी सिंहा आणि वाझे आमने-सामने आल्यानंतर या दोघांमध्ये तब्बल १० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. या दोघांच्या भेटीवरू राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “या दोघांची भेट होणे हे अत्यंत चुकीचे असून या दोघांची भेट नियमबाह्य आहे. एखादा आरोपीला न्यायालयीन कोठडी असताना. त्यांना न्यायालयाच्या परवागनीशिवाय बाहेर भेटण्याचे नसेत. तसे असताना देखील या दोघांची भेट झाल्याची माहिती समजली आहे. यावर पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

सिंहांनी गाडीचा वापर करणे चुकीचे

तसेच गृहमंत्री पुढे बोलताना ते म्हणाले की, “परमबीर सिंह यांचा गाडीचा वापर करत आहेत. ते अत्यंत चुकीचे असून ते कामावर नाहीत त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील सिंहांनी पोलिसांच्या गाडी वापरत आहेत. हे चुकीचे आहे, यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MarathaReservation | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण

News Desk

कराडमधील कृष्णा नदीवरील ब्रिटीशनकालीन पूल कोसळला

News Desk

तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती, भाजपची टीका

News Desk