HW News Marathi
महाराष्ट्र

राकेश मारिया यांच्या ‘लेटी मी से इट आय नो’ आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासा

मुंबई | बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सुपर कॉप राकेश मारिया यांनी गौप्यस्फोट केला आहे. मारियांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारतींनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणीतील संबंधित आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दडवली होतीमाहिती लपविल्याचा गंभीर आरोप केले आहेत. राकेश मारियांचे ‘लेटी मी से इट आय नो’ आत्मचरित्रात लिहिले आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित होण्यापूर्वीच सध्या चर्चेला विषय बनले आहे.

शीना बोरा हत्याकांडाच्या तपासादरम्यान मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदलीवर राकेश मारियांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता मारियांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले की, “देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली.” यामुळे मारियांची बदली केल्याचा आरोपही त्यांनी देवेन भारती यांच्यावर केला.

“राकेश मारिया यांचं कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित आहे. त्यामुळे स्क्रिप्ट रायटिंगचा त्यांच्यावर प्रभाव आहे. हे सगळं प्रकरण म्हणजे पुस्तकाची विक्री आणि येत्या काळात वेब सिरीज बनवण्यासाठी तयार केलेला कंटेंट आहे, देवेन भारती यांनी मारियांच्या आरोपाचे खंडन करत प्रत्युत्तर दिले आहे

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील कसाबला हिंदू दाखविण्याचा प्रयत्न

मारियांनी आत्मचरित्रात मुंबई पोलीस दल आणि महाराष्ट्र सरकारमधील खळबळजनक खुलासा केले आहे. यात मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत अटक केलेला एकमेव दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्याबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला आहे. मारियांनी आत्मचरिता म्हटले की “पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११ हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. १० हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र मिळाले होते, त्यावर समीर चौधरी असे नाव लिहिले होते. समीर चौधरीच्या घराचा पत्ता बंगळुरु लिहिला होता, तर तो हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा उल्लेख त्यावर होता. हल्ल्याच्या रात्री मुंबई पोलिसांचे पथक तपासाठी बंगळुरुलाही रवाना झाले होते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे, खडसेंनी करुन दिली आठवण

News Desk

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न! – उपमुख्यमंत्री

Aprna

नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा कब्जा

News Desk