HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाराष्ट्र बोर्डाने’बारावीच्या निकालाचा फॉर्मुला केला जाहीर

मुंबई । महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेक विध्यार्थ्यांना आणि पालकांना एकाच प्रश्न होता तो म्हणजे मूल्यांकन कुठल्या पद्धतीने केला जाईल याचा. आज (२ जुलै) ला शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

मूल्यांकनाचा फॉर्मुला

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण आणि बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टॉनिक’च संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली, सामनातून भाजपवर टीका

News Desk

राजकारणाची खाज शमली असेल तर देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही

News Desk

उद्धव ठाकरेंसाठी पवारांचे नातू आले धावून..थेट पंतप्रधानांनाचं केलं टार्गेट !

News Desk