HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

मुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये आज (३१ जुलै) प्रवेश करणार आहेत. हे सर्वजण मुंबईतील गरवारे क्लब येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी २७ जुलैला राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. चित्रा वाघ यांनी त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी काल (३० जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आहे. शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साताऱ्यातील इच्छुकांच्या मुलाखतीकडे त्यांनी पाठ फिरवल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवेंद्रराजे बाहेर जाणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी सांगितले होते. परंतु पवारांनी प्रयत्न करूनही शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

तर दुसरीकडे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक देखील भाजप प्रवेश करणार आहेत. तसेच नाईक यांच्यासोबत महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व ५२ नगरसेवक देखील राजीनामा देऊन भाजपच्या डेऱ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे समर्थक मधुकर पिचड आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी देखील भाजपत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर यांनी काल (२९ जुलै) आपला राजीनामा प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे. कोळंबकरांनी मागेच भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.

गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. प्रवेश करणाºया नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी

swarit

राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा निर्णय

News Desk

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk