HW News Marathi
Covid-19

जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार !

सांगली | गेल्या काही वर्षापांसुन कर्नाटकमधीस अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे.यंदा तशी परिस्थिती होऊ नये म्हणुन महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचा मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची उद्या भेट घेणार आहेत.

जयंत पाटील म्हणाले , सातारा, सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा उदभवू नये, म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत. याबाबतीतच मी उद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मा. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार आहे.

या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर तदनुषंगिक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा – अजित पवार

News Desk

राहुल गांधींच्या भेटीसाठी नाना पटोले दिल्लीला जाणार, ‘हे’ आहे कारण

News Desk

महाविकास आघाडीतील १८ मंत्र्यांच्या बिलांचा खर्च सरकारमधील तिजोरीतून जाणार, माहिती अधिकारातून उघड

Aprna