HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक !

मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊन यांचा फटका हा सर्व स्तरातील लोकांना तर बसला आहेचं पण यात लावणी कलावंताचेही खूप हाल झाले. मार्च, एप्रिल आणि मे हा तीन महिन्याचा काळ लोककलावंतसाठी अतिशय महत्वाचा काळ होता. या काळात सर्व लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली . राज्यात विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्तीच्या १२ जागांपैकी एका जागेवर कलावंत म्हणून नियुक्ती होण्याबाबत लोककलाकार मंगला बनसोडेंना काय वाटतं ? तीन महिन्याच्या काळात त्यांनी काय केले आदी विविध विषयांवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बातचीत केली.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक आहात का? आणि कोणत्या पक्षाकडून जागा हवी, या प्रश्नावर बोलताना मंगला बनसोडे म्हणतात, मी ही विधानपरिषदेच्या जागेसाठी इच्छुक आहे. मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या, “आता लोककला लोप पावत चालेली आहे. यात तमाशाच्या फडातील १०० लोकांचे पोट भरायचे कसे?, हा प्रश्न कलावंतसमोर उभा राहतो. मला १० ते १५ वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातून खासदारकीची ऑफर आली होती. राजेंद्र देशमुख यांच्यांकडून ऑफर आल्याचा खुलासा मंगला बनसोडे यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना केला. लावणींचे कार्यक्रम करत असल्यामुळे तेव्हा ती ऑफर नाकारली. माझ्या कार्यक्रमामुळे ज्यांचे पोट भरते, त्यांचे नुकसान होईल म्हणून मी खासदारकीची ऑफर नाकारली. आणि आता मी ७० वर्षाची झालेली आहे. तरी माझा कलावंतांसाठी जीव तुटयोत. माझ्या कलांवतांचे मुले-बाळे जगली पाहिजे, त्यांचे संसार चालले पाहिजे. यासाठी आजही स्टेजवर नाचते , असे, मंगला बनसोडे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

राज्यपाल यांच्याकडून नियुक्ती व्हावी

विधानपरिषदेवर नियुक्ती करायची झाली तर ती कोणत्या पक्षाकडून झाली पाहिजे की थेट राज्यपालांकडे जाणार या प्रशावर बोलताना मंगला बनसोडे म्हणाल्या, मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच जाईन. आणि त्यांच्याकडून मला विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा त्यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना बोलून दाखवली. कारण राजकारणाचा मला फार काही अनुभव नाही. कारण आमच्या येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तशा ऑफर आली तर मी तसे काम करेन, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

लॉकडाऊनमुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका लावणी कलावंताला बसला या प्रश्नावर बोलता मंगला बनसोड म्हणाल्या, लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आधीच्या हंगामात निवडणुका लागल्या होत्या आणि दुष्काळ पडला होता यातून सावरत असतानाच मार्च महिन्यात लावणी कलावंतचा हंगाम असतो. नेमके याच महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल तीन महिने लावणी कलांवतांवर उपासमारीची वेळ आली. विविध भागातील असे जवळपास १२५ कलांवत मंगला बनसोडे यांच्या फडात काम करतात. लॉकडाऊनमुळे या सर्वांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या कालावधीत मी माझ्या कलावंतांना लागेल तशी पैशाची मदत केल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, आमच्यासारख्या कलांवतांना राज्य आणि केंद्र सरकारचा कोणताच आधार नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली

मंत्री आणि संस्थांकडूही मदत नाही

लॉकडाऊनच्या काळात कलांवतांना मदत करावी म्हणून तुम्ही कोणते मंत्री आणि संस्थांना मदतीसाठी निवदेन दिली, याप्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या , “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या सर्वांना निवेदन दिले. ते म्हटले, कलावंतांना अनुदान मिळावे, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक घेऊन शासनाकडून तुम्हाला सर्वांना काही तरी अनुदान मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच सातारा जिल्ह्याचे लक्षण माने यांनी संगीत पार्टीवाल्यांना तीन हजार रुपये दिले. पण आम्हाला अजूनही पैसे आले नाही. तमाशा वेगळा आणि संगीत पार्टी या वेगळ्या आहेत.

लॉकडाऊनच्या आधी लोकांनी तमाशाला दिलेल्या सुपाऱ्यांच काय झालं ? यावर मंगला बनसोडे म्हणतात, लॉकडाऊनच्या आधी दिलेल्या सुपाऱ्या सर्वांनी फोन करून त्या रद्द केल्या. काही लोकांनी पाच हजार तर कोणी १० हजार असे पैसे दिलेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व यात्रा रद्द झाल्या.

लॉकडाऊनच्या काळात कुटुंबियांसोबत वेळ घालविला

लॉकडाऊनच्या तीन महिन्यात मंगला बनसोडे यांनी काय केले?

मंगला बनसोडे म्हणातात की, माझ्या सुना, नातवंडे त्यांच्यासोबत बसत होते. आणि कधीकधी एकटीच गाणी गायचे आणि नाचायचे . काही काम नसले तरी कलांवतांना करमत नाही. जी जुनी कला होती. ती टिकटॉक, मालिका आणि चॅनेलने यामुळे आता तमाशा कलेवर मोठे संकट आल्यासारखे झाले. पूर्वी आम्ही १० तास तमाशा करायतो लावणींचे चहाते दूरून आमचा तमाशा बघण्यासाठी येत होते पण आता काळ बदलला. या लाॅकडाऊन नंतर तरी आमचा तमाशा कसा सुरू करता येईल आमच्या कलेला जिवंत कसे ठेवतां येईल याकडे आता सरकारने लक्ष द्यावे आणि आम्हांला मदतीचा हात द्यावा

संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात ३ दिवस केवळ दुध आणि मेडिकल सेवाच सुरु राहणार

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदारकीची शपथ घेणार

News Desk

“कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालो”

News Desk