HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून सोलापुरात संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

सोलापूर | सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सोलापूरमध्ये कठोर पाले उचलण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज (२० एप्रिल) दुपारी दोन ते गुरुवारी (२३ एप्रिल) रात्री १२ पर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने आणि पोलिस दलाचे काम सुरू राहणार आहे. शहरातील सर्व आस्थापना व शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत.

यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही उद्योगाला परवानगी दिली जाणार नाही. तसेच शहरात सकाळी ६ ते ११ पर्यंत दूध विक्री करता येणार आहे. त्याशिवाय पेट्रोल पंपही सकाळी ११ पर्यंत सुरु राहणार आहेत, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. अत्यावश्य सेवा पुरवणारे खासगी, सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांची वाहने, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने, पाणी पुरवठा, अग्निशामक, विद्यूत पुरवठा, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे आदेश लागू नाहीत, मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna

TET Exam Scam : पुणे पोलिसांकडून कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

Aprna

HW Exclusive: केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तुम्हाला घटकपक्षांची गरज लागते !

News Desk