HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaVirus : आजपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमित सुरू !

नवी मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. यामुळे राज्यासह देशभरातील सर्व दुकाने, खासगी कंपन्या, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बाजापेठा बंद ठेवणल्याने लोकांना भाजीपाला मिळत नव्हता. यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, म्हणून मुंबई कृषी उत्पन बाजार समिती सुरु ठेवण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठ व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नियोजन करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी आडवू नये, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

तसेच “आजपासून (२६ मार्च) नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे.शासनाच्या वतीने भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी,” असे भुजबळ यांनी ट्वीट करत राज्यातील जनतेला माहिती दिली आहे.

दरम्यान, बाजार पेठ सुरू ठेवण्यााच निर्णय घेतल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. यामुळे कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ही गर्दी टाळण्यासीठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठेच्या गेटवर महत्वाची सूचनाही लावण्यात आल्या आहेत. या सूचनेमध्ये म्हटले की, व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझरने हात धुवून आणि मास्क तोंडाला बांधून मार्केटमध्ये प्रवेश करावा. जर या सुचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

 

 

 

 

Related posts

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणात भरत कुरणे ?

News Desk

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk