HW News Marathi
महाराष्ट्र

इंधन दर ५ रुपयांनी कमी करुनही पुन्हा १८ पैशांनी महागले

मुंबई | केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी २.५० रुपयांच्या कपातीची घोषणा केली होती. केंद्रच्या या घोषणेनंतर जवळपास ११ राज्यांनी आणखी २.५० कमी करुन ५ रुपयांची कपात जाहीर केली होती. तरी देखील मुंबई शुक्रवारी पेट्रोल ८६.९७ रुपये प्रतिलिटर या दराने विकले गेले.

मुंबईत शनिवारी (६ ऑक्टोबर)ला पेट्रोल १८ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. तर डिझेल ७० पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटरचे दर ८७.१५ तर डिझेलचे प्रति लिटर दर ७६.७५ ऐवढे आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल १८ पैसे तर डिझेल २९ पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे ८१.६८ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ७३.२४ रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या कर कपातीचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्षात घेता आलाच नाही. त्यामुळे सरकारने सर्व सामान्यांची फसवणूक केली असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात ५ रुपयांनी स्वस्त झाले असले तरी देखील प्रत्येक्षात महाराष्ट्रात पेट्रोल ४.३७ तर डिझेल ४.०६ रुपयांच्या कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोलवरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र, डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

News Desk

भंडाऱ्यामध्ये वडापाची टॅक्सी नदीत कोसळून भीषण अपघात

News Desk

’25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता तर 11 जिल्ह्यांमध्ये नियम कायम’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा!

News Desk