HW News Marathi
महाराष्ट्र

दहावीच्या निकालाच्या दोन्हीही वेबसाईट डाऊन..!

मुंबई। महाराष्ट्र राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९९. ९५ टक्के लागला आहे. तर कोकण विभागाचा निकाल हा १०० टक्के, मुलांचा निकाल ९९.९४ टक्के, तर मुलींचा निकाल ९९.९६ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या आहेत. हा निकाल विद्यार्थ्यांना https://result.mh-ssc.ac.in, https://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. इ.१०वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली.

सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याचा आकडा आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन २०२१ मध्ये इ.१०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण https://result.mh-ssc.ac.in, https://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करा

News Desk

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

News Desk

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

News Desk