मुंबई | कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्त्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत. त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले.
इंधन बचत जनजागृतीपर वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण
हिंदी वादविवाद स्पर्धेत अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्लाच्या शेख अरफा अब्दुल रेहमान, खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली, कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूलच्या आयेशा शेख, मोनू वाल्मिकी यांना गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडूप या विद्यालयातील स्वाहा कांबळी, स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आला. विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहूच्या प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आला. इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर ट्रॉफी प्राप्त केली. महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्लीतील प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांना गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहिणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ व दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज हे प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच इंधन बचतीची शपथही देण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.