HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंची समिती नेमून चूक केली, हसन मुश्रीफांचे मोठे वक्तव्य

कोल्हापूर | खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आज (१६ जून) कोल्हापुरात मूक आंदोलन झाले. या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी, मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नसल्याचे सांगत आयोग न नेमता नारायण राणेंची समिती नेमून आरक्षण देणं चूक होती, असे म्हटले. गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळावर मूक आंदोलन झाले.

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पावसामुळे मुबंईत अडकले होते. काही तासांनी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवत आपली भूमिका मांडली. मुश्रीफ म्हणाले, ‘५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा असल्याचे कारण पुढे करत मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ होत आहे. पंरतु गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचं आहे. मराठ्यांना शिक्षण नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. मराठे राजकीय आरक्षण मागत नसून स्वतःच्या उन्नतीसाठी शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मागत आहेत.

“आपण उद्याच मुंबईला चला, मी मुख्यमंत्र्यांची भेट करुन देतो”; सतेज पाटलांचं संभाजीराजेंना आवाहन

“संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे हे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारला एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण आपली भेट घेतील. राज्य सरकार सकारात्मक असून तुमच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आपण उद्याची वेळ देऊन मुंबईला यावं,”अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा राणे भोसले वाद पोस्टर वर, भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल

News Desk

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

News Desk

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे

News Desk