HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी

कोल्हापूर | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यावर सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे. “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत आहे”, अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्यावर वक्तव्य केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप काल (२५ फेब्रुवारी) सामाजिक न्याय मंत्री आठवले, आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते करण्यात आलं. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, “डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील”, असा दावाही यावेळी रामदास आठवले यांनी केला. तसेच, राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. याशिवाय भाजपचे नेते नारायण राणे यांनी ११ दिवसात महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला आहे. राणे असे काही म्हणत असतील तर तशा हालचाली होत असतील”, असे रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

 

Related posts

वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या

rasika shinde

तरूणीवर सामुहिक बलात्कार, बलात्कार प्रकरणी तीन तरूणींना अटक

News Desk

स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात !

News Desk