HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवावी – गृहराज्यमंत्री

मुंबई | नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी आल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना जिविताचा धोका उद्भवू नये यासाठी अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री, (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) देसाई यांनी घेतला.

याबाबत मंत्रालयीन दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंग, अपर पोलीस महासंचालक (नियोजन) संजय कुमार वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके, सहआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग सुनील कोल्हे, ठाणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराडे, ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुक्तावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी रवी राणांवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल

Aprna

“मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा” – नाना पटोले

News Desk

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा!

News Desk