HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही आमचे जेवढे नगरसेवक फोडाल त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू, गणेश नाईकांचा इशारा  

नवी मुंबई | “तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडणार त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू,” असा इशारा भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोधकांना दिला आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये भाजपला गळती लागली असून अनेक स्थानिक नेते आणि कार्य़कर्त्यांनी भाजपला रामराम केला आहे. याच पार्श्वभूमीवर नाईक यांनी वरील वक्तव्य केले. ते नेरुळ येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.

“जर तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार जण फोडू, चार फोडले तर आठ फोडू, तुम्ही आमचे जेवढे नगरसेवक फोडाल त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू,” असे नाईक म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना मी एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सूचक इशाराही दिला आहे. त्यामुळे याचे पडसाद राजकारणात काय उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आणि विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

News Desk

सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार!

News Desk

आषाढी एकादशीच्या दिवशी तीन तास विठ्ठल दर्शन रहाणार बंद

News Desk