HW News Marathi
महाराष्ट्र

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी!

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाची गेले दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज त्याला निरोप देण्याची घडी आली आहे. सकाळीपासूनच मुंबई पुण्यातील गणरायांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा गजर आसमंतात दुमदुमून राहिला आहे.

मुंबईतील गणेश गल्लीचा गणपतीही दरवर्षीप्रमाणे यंदा सर्वांत आधी विसर्जनासाठी निघाला आहे. मुंबईतील तब्बल १९९ ठिकाणी गणपतींचे विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यातही गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. यासाठी शहरातील प्रमुख १७रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आता सुरूच होत आहेत. दगडूशेठ हलवाईची मिरवणूक संध्याकाळनंतर सुरू होईल. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. ७ हजार ५०० पोलीस तैनात असणार आहेत. यात महिला आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथकेही असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

News Desk

धुळ्यात जयंत पाटलांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

News Desk

अपहरणाच्या भीतीने तरुणीची भरधाव रिक्षातून उडी

News Desk

शिक्षणाधिकारी सविता बिरगे चार लाख लाच घेताना रंगे हात अटक  

News Desk