HW News Marathi
महाराष्ट्र

धुळ्यात जयंत पाटलांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा

धुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, धुळ्यामधील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच पक्षातील गटबाजी समोर आली आहे. जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेे पाहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही हाणामारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे धुळे येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात अनिल गोटे यांचे समर्थक असलेले भूषण पाटील हे भाषणासाठी उभे राहीले असताना त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादास सुरुवात झाली. थोड्या वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि प्रदेशाध्यक्षांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या हाणामारीबाबत विचारणा केली असता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर कार्यकर्त्यामध्ये काही गोष्टींमुळे नाराजी असल्याने त्यांनी आपल्या मनातील राग यावेळी व्यक्त केला, अशी सारवासारव इतर नेत्यांनी केली. दरम्यान, ही हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे कळू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काहीही करा, मदत केल्याशिवाय जाऊ नका” चिपळूणच्या महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांजवळ हंबरडा…!

News Desk

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk

अत्याचार अत्यंत किळसवाणा, आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्या – पंकजा मुंडे

News Desk