HW News Marathi
महाराष्ट्र

गोकुळ निवडणुकीसाठीच्या इच्छुकांसाठी राजू शेट्टींची अनोखी अट 

कोल्हापूर | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या माध्यमातून दूध संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय कुस्ती सुरु झाल्याचं पहायला मिळतंय. या कुस्तीत कोणता पहिलवान कोणत्या गटाचा हे आतापर्यंत बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. आता या रणधुमाळीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांनी किमान १० लिटर दूध न थकता काढून दाखवावे अशी अनोखी अट घालण्याची मागणी केली आहे.

ज्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, त्यात भाग घ्यायचा आहे, त्यांनी न दमता किमान १० लिटर दूध काढून दाखवावे अशी एक अट घालावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. अशी जर अट घातली तरच गोकुळ हा दूध संघ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राहिला असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. एक म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि दुसरे म्हणजे 25 वर्षे गोकुळवर वर्चस्व ठेवलेले महादेवराव महाडिक. गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गोकुळची सत्ता टिकवायची असेल तर सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने महादेवराव महाडिक यांनी बुधवारी सकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. गोकुळ हा अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन करणाऱ्या सर्वसामान्य उत्पादकांचा संघ आहे आणि त्यावर कब्जा करण्यासाठी आता अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे गोकुळ वाचवायचं असेल तर तुमची सोबत हवी असे साकडे महाडिकांनी राजू शेट्टींना घातलंय. ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी गोकुळमधून किमान ३० टन पशुखाद्य घेतलं असलं पाहिजे अशी अटही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश

News Desk

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ED कडून अटक; तब्बल १२ तास चालली चौकशी

News Desk