HW News Marathi
महाराष्ट्र

हो माझी चूक झाली, कायद्यानुसार जरुर कारवाई करा, इम्तियाज जलील यांचा ‘त्या’ कृत्यावर माफीनामा  

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता हा जल्लोष केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असं जलिल यांनी म्हटलं आहे. पण आपली चूक मान्य करतानाच त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

“होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा”, अशी मागणी जलील यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण या निर्णयाला जलिल यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. जलिल यांनी तर या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश काल देण्यात आला आहे. लॉकडाऊन रद्दच्या निर्णयानंतर जलिल आणि त्यांचे काही कार्यक्रर्ते रस्त्यावर उतरले. समर्थकांनी जलिल यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूकही काढली होती.

अमेय खोपकर काय म्हणाले?

“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी केली संजय राठोड यांची पाठराखण आणि म्हणाले…

News Desk

अन् खडसेंनी चुकून दोन वेळा केला ‘भाजप’चा उल्लेख

News Desk

ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

swarit