HW News Marathi
महाराष्ट्र

कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकतो !

मुंबई | “कोणत्याही क्षणी गोड बातमी येण्याची शक्यता,” असे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. “आम्ही शिवसेनेच्या प्रस्तावची वाट बघत आहोत, असे देखील मुनगंटीवारांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाच सरकार स्थापन होणार,” असा विश्वास मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज (५ नोव्हेंबर) भाजपची बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

“शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली,” असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आले नसल्याचे देखील पाटलांनी यावेळी नमुद केले.” “आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करून,” असा दावा देखील पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार,” असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता १३ दिवस उलटूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री पदा आणि सत्तेचे समान वाटपावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदे घेऊन भाजपवर निशाणा साधत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर एसटी कर्मचारी विलिनीकरणाबाबत निर्णय घेणार! – अनिल परब

Aprna

बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

News Desk

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, फडणवीसांच्या या विधानाने अजितपवारांना हसू अनावर ! 

News Desk