HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे | अजित पवार 

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२१ जानेवारी) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, केंद्राकडून येणारे पैसे याबद्दल भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अजित पवारांनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. उद्या ते पुण्याला जाणार आहेत. सध्या पक्षांतर बंदी कायदा आहे. पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवकपद रद्द होईल. भाजपच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे. काही मिळालं नाही की माध्यमं अशा बातम्या पसरवात, असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नगरसेवकांच्या पक्षांतरांच्या चर्चांविषयी विचारलं असता माध्यमांना सुनावलं होतं.

राज्यातील अडचणींवर आम्ही योग्य मार्ग काढू !

महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असते त्यावेळी निकाल काय लागतो, याची वाट पाहावी लागते. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येसारख्या मार्गानं जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले. एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला नको होती. राज्यातील विविध अडचणींवर आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील जनतेला समोर ठेवून, सर्व जाती धर्माच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही, असं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गानं हे राज्य चालतं, आम्ही त्यांच्या मार्गानं जाणारे आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

मी फाईल पेडिंग ठेवणारा माणूस नाही !

मी फाईल पेडिंग ठेवणारा माणूस नाही. मोठे निर्णय एक मंत्री घेत नसतो, संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची तिजोरी पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक परिस्थिती आणि कोरोनाचा विचार करुन पावलं उचलावं लागतात. केंद्राकडून आमचे २५ हजार कोटी रुपये येणे आहे. ते अजून आले नाहीत, हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमुळे ३ महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे

News Desk

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची काळी दिवाळी

Gauri Tilekar

आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्ताने जाणून घ्या… व्रतकथा, महत्व अन् मुहूर्त

News Desk