HW News Marathi
महाराष्ट्र

Goodbye 2021 : ‘या’ नेत्यांना वर्षभरात आली ईडीची नोटीस

मुंबई | संपूर्ण जगाला कोरोनामुळे नकोसे झालेले २०२१ हे वर्ष आले आणि कोरोना परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले. तसेच २०२१ वर्षात कोरोनावर व्हॅक्सीन देण्यास सुरुवात झाली होती. आता २०२१ हे वर्षही संपायला आलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंटने जगामधील काही देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्या आला आहे. तसेच या सरत्या वर्षात कोरोनाखेरीज अनेक चांगल्या वाईट घटना या वर्षात घडल्या. तर राजकीय क्षेत्रात सुद्धा अनेक छोट्या-मोठ्या घडामोडी राज्यात लक्षवेधी ठरल्या. यापैकीच एक म्हणजे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा. या वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली.

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील नेत्यांवर कारवाईची मालिका सुरू आहे. भाजप राज्यात त्यांचे सरकार नसल्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीच्या ससेमिरा लावून त्यांना त्रास देस असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. आतापर्यंत ईडीने राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय राऊत, भावना गवळी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांना समन्स बजावले आहे. तर अजूनही काही नेते तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याची शक्यता वर्तवली जात  आहेत.

सोमय्यांचा आरोप होताच येते नोटीस ?

भाजपचे नेते व विशेष करून किरीट सोमय्या हे आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. सोमय्या यांनी आरोप करताच संबंधितांना ईडीची नोटीस बजावण्यात येते, असे चित्र सरत्या वर्षात पाहायला मिळतं. शिवसेना खासदास संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना जमीन खरेदी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले. त्यानंतर एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक, अनिल परब, अजित पवारांचे निकटवर्तीय संचालक असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही ईडीने नोटीस पाठवली. तसेच शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्या तीन शिक्षण संस्था असल्याने त्यांनाही ईडीची नोटीस आली आहे.

एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना १५ जानेवारी रोजी ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले. भोसरी जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्येही त्यांची चौकशी केली गेली. खडसे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरिश चौधरी हे सुद्धा अडचणीत सापडले असून ईडीकडून गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली.

अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केल्यानंतर देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भावना गवळी

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित संस्थांच्या नऊ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. यवतमाळ-वाशिम येथील शिक्षण संस्थांवर ३० ऑगस्ट रोजी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू असल्याचे गंभीर आरोप गवळी यांनी केले.

प्रताप सरनाईक

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांना २६ नोव्हेंबर २०२० रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नोटीस बजावली. या प्रकरणात त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावरही ईडीने छापे मारले होते. तसेच त्यांचे निकटवर्तीय अमित चंडोल यांना अटक झाली.

संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचे समन्स

प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले. २९ डिसेंबर २०२० रोजी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.

अनिल परब

रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोन अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपाप्रकरणीही परब यांची चौकशी करण्यात आली.

आनंदराव अडसूळ

शिवसेनेचे माजी खासदार आनंदरावर अडसूळ यांनाही ईडीने समन्स बजावले होते. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी झाली. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू असून सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी रवी राणा यांनी अडसुळांविरोधात ईडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर अडसुळ यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले.

सीताराम कुंटे

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना २४ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीने समन्स बजावले. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावर बढती देण्यात आली. त्यामुळे कुंटेंना समन्स बजावण्यात आले.

रवींद्र वायकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील समजले जाणारे शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनाही नुकतेच ईडीचे समन्स बजावण्यात आले असून २१ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र, नेमकी कोणत्या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या चौकशीबाबत ईडीने कमालीची गुप्तता बाळगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत

swarit

‘अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही’, गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर वार

News Desk