HW News Marathi
देश / विदेश

“फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या ५ वर्षे अगोदरच झालं” पडळकरांची थोरातांवर शेलक्या शब्दांत टीका

मुंबई। राज्यात ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयान रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याच पहायला मिळतय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवर आता भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात फडणवीसांचे लग्न विदर्भ यात्रेच्या ५ वर्षं आधीच झाले होते, असं म्हणत पडळकरांनी बाळासाहेब थोरातांवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत ते रद्द राहिल, असा निर्णय दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची घोषणा केली. राज्याची सूत्रं भारतीय जनता पक्षाकडं दिली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण मिळवून देतो. जर हे मी करू शकलो नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणालेत?

फडणवीसांच्या राजकीय संन्यासाच्या विधानावर जेव्हा महसूलमंत्री बाळासाहेब प्रतिक्रिया दिली तेव्हा फडणवीसांच वक्तव्यं गांभिर्यानं घेण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी जुन्या वक्तव्यांचा संदर्भ दिला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू म्हणाले होते. सत्तेसाठी ते काहीही बोलत असतात. त्यांच्यावर काय विश्वास ठेवता, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला होता. त्यावर आता भाजपकडून पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पडळकरांची थोरातांवर टिका

महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात फडणवीसांचे लग्न विदर्भ यात्रेच्या ५ वर्षं आधीच झाले होते, असं म्हणत पडळकरांनी बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला मुंबई ATSकडून अटक

News Desk

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबत राज्यपालांना सूचना करावी, ठाकरे सरकारची मोदींना विनंती

News Desk

खासदार महिला सुद्धा कास्टिंग काऊचपासून अपवाद राहिल्या नाही

Adil