HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर सुसाट ; पवारांनंतर आत्ता ठाकरेंना आव्हान

पुणे | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जेजूरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे मेंढपाळांच्या हस्ते अनावरण केले होते. प्रस्तावित कार्यक्रम शरद पवार यांच्यासह होळकर घराण्याच्या वंशजांच्या उपस्थित होणार असल्याने यास त्यांनी विरोध जाहीर केला होता.

या घटनेनंतर आत्ता पुन्हा एकदा पडळकरांनी दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या नंतर आत्ता त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. येत्या १६ मार्च रोजी औंढ्या नागनाथ येथे अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलय.

औंढ्या नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. माझं कुटूंब माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही त्यामुळे समाजाच्या वतीने येत्या १६ तारखेला औंढ्या नागनाथ येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे..

जेजुरी येथील पुतळ्याचे अनावरण व वाद

फेब्रुवारी महिन्यात जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण पडळकरांनी केले होते. प्रस्तावित कार्यक्रमापुर्वीच पहाटे साडेपाच वाजता आपल्या कार्यकर्त्यांसह याठिकाणी पोहचत मेंढपाळाच्या हस्ते अनावरण केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. छत्रपती संभाजी, होळकर घराण्याचे वंशज, महादेव जानकर आदी प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत नियोजित कार्यक्रम पार पडला होता. शरद पवार यांच्यानंतर १६ मार्च रोजी औंढ्या नागनाथ येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण म्हणजे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी घरची धूनी रस्त्यावर धुत नाही आणि ते आमचे ज्येष्ठ नेते मी त्यांच्यावर आरोप करणार नाही – देवेंद्र फडणवीस

News Desk

आदित्य ठाकरेंनी फेटाळल्या मनपा निवडणुकीबाबतच्या ‘त्या’ चर्चा

Aprna

महाविकास आघाडीतील ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय हालचालींना सुरूवात

News Desk