HW News Marathi
देश / विदेश

मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश, पश्चिम बंगालसाठी स्टार प्रचारक ठरण्याची शक्यता…

कोलकाता | पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप प्रवेश केला आहे. कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

आज दिनांक ७ मार्च रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येवू लागली तोच अनपेक्षितरित्या आजच्याच दिवशी भाजप प्रवेश केला.

यापुर्वी मिथुन चक्रवर्ती ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. सोबतच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान ममतांचा पाठींबा मिळवून प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येत. 2016 च्या निवडणूकीमध्ये भाजपला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०२१ च्या संभाव्य निवडणूकीत मिथून भाजपसाठी स्टार प्रचारक ठरतील अशी चिन्हे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

Republic Day | सौंदर्य प्रजासत्ताक दिनाचे

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk