HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”, पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर पडळकरांची खोचक टीका

सांगली | अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपने अखेर विजयी गुलाल उधळला आहे. दिवंगत राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे. याच मुद्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. “मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी खोचक प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?

“पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. त्यांनी यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले. यावेळी करेक्ट कार्यक्रम पंढरपूर मध्ये करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनतर पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत. या मतदारसंघाने तसं दाखवून दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदासंघाच्यी पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (२ मे) पार पडली. यावेळी मतमोजणी करताना समाधान आवताडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. ते ३७३३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयामुळे राज्याच्या भाजपमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप महाविकास आघाडीला सामोरे जाईल, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३-४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा गायब; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

News Desk

लम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत! – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

Aprna