HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात….

मुंबई | पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या कारणावरून महा विकास आघाडीतल्या सरकार मधले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या काही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत या संदर्भातील अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती. तर उपमुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांच्याबरोबर काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची बैठकही झाली. याच मुद्यावरून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची चर्चा सोलापुरात सुरूय, त्यावरून धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत त्यांना हटवण्याची मोहीम राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. पाच वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं तरी ते सांगेल कोणता पक्ष जातीयवादी आहे, असं पडळकर म्हणाले.

पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, हे सुस्पष्टपणे दिसतंय, असे प्रत्त्युत्तर पडळकर यानी दिलं आहे.

पदोन्नती आरक्षण रद्दच्या निर्णयावरुन काँग्रेस नाराज

पदोन्नतीतील एससी-एसटी आरक्षण हटविण्याच्या मुद्यावर काँग्रेस नाराज आहे. या संदर्भातील अध्यादेश सरकारंन रद्द करावा अशी मागणी, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर, नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कायदेशीर आणि प्रशासकीय बाजूंचा अभ्यास करुन सकारात्मक निर्णय होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत

News Desk

भगतसिंग कोश्यारींना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा उद्या होणार शपथविधी

Aprna

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk