HW News Marathi
महाराष्ट्र

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही, सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

मुंबई |भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी ११ एप्रिलला पावसात सभा घेतली होती. त्या सभेवरुन पडळकरांनी हे टीकास्त्र सोडलं. पडळकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निशाणा साधला आहे. दरम्यान, या दोन्ही पक्षांतील ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

 

जयंत पाटील यांची पावसात सभा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षसुद्धा गेले नसते. मात्र, भर पावसात जयंत पाटील यांनी सभा दणाणून सोडली . त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली होती.

सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असताना तसूभरही विचलीत न होता पवारांनी ही सभा दाणाणून सोडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजेंचे उपोषण सुरू, “सर्व मराठ्यांना एका छताखाली आणण्यासाठीचा हा लढा!”

Aprna

सीरममध्ये लागलेल्या आगीत घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही – शरद पवार

News Desk

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गालबोट,बॅनरवर फोटो नसल्याच्या नाराजीतुन तालुकाप्रमुखाला गंभीर मारहाण

News Desk