HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा पुरोगामीपणाचा बुरखा फाडला गेला, पडळकरांची जहरी टीका

सोलापूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (३० जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर त्या टीकेचे पडसाद उमटताना दिसले. काल सोलापूरात पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली. यावर पडळकरांनी भाष्य केलं असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “माझ्या गाडीवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. हल्ला करणारा शरद पवारांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. हल्ल्यानंतर पवारांच्या नावाची घोषणा दिल्या गेल्या. तसेच राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राष्ट्रवादीची हल्ल्यामागील भूमिका स्पष्ट दिसते. राष्ट्रवादी मुद्दा सोडून गुद्द्यावर येत आहे”, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

राष्ट्रवादीच्या पुरोगामीत्वाचा बुरखा फाडला गेला

गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “या घटनेने राष्ट्रवादीच्या पुरोगामीत्वाचा बुरखा फाडला गेला आहे. राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, तर त्यांनी मुद्द्यांवर भाष्य करावं. मराठा आरक्षण रद्द झालं, ओबीसी आरक्षण गेलं, यावर शरद पवार का बोलत नाहीत? मी ग्रामीण भाषेत बोललो, त्यात वावगं काय?”, असेही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

पडळकरांच्या गाडीवर हल्ला

सोलापूर मड्डी वस्ती परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी ८ वाजता समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचे कळते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसासाठी आले होते. सकाळी सोलापूरात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली होती यातुनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, जिल्ह्यातील भाजप कार्येकर्ते पडळकर यांना भेटायला येत असल्याने गर्दी होत आहे.

‘आज दगडफेक, उद्या गोळ्या मारतील’ – गोपीचंद पडळकर

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही.

आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही. घोंगडी बैठक उरकुन बाहेर आहे. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा ४ ते ५ लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : बुलढाण्यात ४ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्याची संख्या २१ वर

News Desk

खासदार संभाजीराजेंची मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा !

News Desk

जर आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजेंची मागणी

News Desk