HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या आढावा बैठका रद्द, घेतले एक पाऊल मागे!

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली होती आणि कामात ढवळाढवळ करू नये याचा सल्ला देखील दिला होता. मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.

राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नये

राज्यसरकाने केलेल्या कामात राज्यपालांनी ढवळाढवळ करू नये असा सल्ला दिला होता. राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाशी आढावा बैठका ठेवल्या होत्या. त्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाहीत, राज्यात दोन सत्ताकेंद्रे करू नका असे अवगत करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले होते.

काय म्हणाले नवाब मलिक ?

राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नांदेड येथील स्वा. रा. तीर्थ विद्यापीठात दोन वसतिगृहे बांधली आहेत. सध्या वसतिगृहे विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत. त्यामुळे त्याचे उद्घाटन राज्यपालांनी करू नये, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र राज्यपालांनी हे आवाहन धुडकावले. सुधारित दौऱ्यातही वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखिलेश यादव 4 फेब्रुवारीला मुंबई दौ-यावर

News Desk

१२ लाख दिव्यांनी उजळून निघणार ‘अयोध्यानगरी’, गिनीज बुकमध्ये होणार नोंद

News Desk

‘रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात केला कोर्टात दावा’, शिवसेना राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी!

News Desk