HW News Marathi
महाराष्ट्र

‘विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध’, राज्यपालांचं आश्वासन

नांदेड | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज(५ ऑगस्ट) नांदेड दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी संवाद साधला असता काही महत्वाची आश्वासनं देखील दिली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नांदेडच्या स्वामीरामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेटी दिल्या यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे.

निधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज(५ ऑगस्ट) नांदेडच्या स्वामीरामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेटी दिल्या. यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या दौऱ्यावरून आधीच वाद पेटला आहे. ते सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसांचा दौरा करत आहेत.

राजनिती तुम करं रहे हो मैं नही

राज्यपालांच्या दौऱ्यावरून आधीच वाद पेटलेले होते. त्याचं प्रत्युत्तर आज(५ ऑगस्ट) कोश्यारींनी दिलं आहे. ‘राजनिती तुम करं रहे हो मैं नही ‘अशी उपरोधिक टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नांदेड दौऱ्यावर असताना केली. पत्रकारांनी दौऱ्यावरुन राजकारण होत असल्याचा प्रश्न विचारला असता राज्यपालांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता राजकीय वाद वाढण्याची चिन्हे आहेत.महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. ठाकरे सरकारनं राज्यपालांच्या या दौऱ्याला विरोध केल्यानंतरही राज्यपाल दौरा करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रातून आवाहन

News Desk

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

News Desk

“देवेंद्रजी तुम्हाला परत यावचं लागेल पण अजितदादा तुम्ही पण परत या”, भाजपकडून सभागृहात खुली ऑफर

News Desk