HW News Marathi
महाराष्ट्र

दापोलीत अनिल परब आघाडीवर, तर रामदास कदमांना धक्का!

रत्नागिरी | राज्यातील १०६ नगरपंचायत आणि भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकांचा आज (१९ जानेवारी) निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. तर संपूर्ण राज्याचे या निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकांसह विविध राजकीय पक्षांमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे विशेष चर्चेत आहे. मात्र, या नगरपंचायतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ७-७ अशा समसमान जागा मिळाल्या असून रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना धक्का बसला आहे.

दापोलीतील निकाल –

एकूण जागा – १७

शिवसेना – ७

राष्ट्रवादी – ७

इतर(अपक्ष) – २

भाजप – १

काँग्रेस – ०

दरम्यान, दापोली नगरपंचायतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने आघाडी मिळवली असून भाजप येथे स्वबळावर लढत आहे. तर या निवडणुकीत शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना डावलून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सगळी सूत्रे दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे कदम आणि परब या दोघांसाठी ही निवडणूत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. तर आतापर्यंतच्या निकालानुसार शिवसेना ७, राष्ट्रवादी ७, इतर (अपक्ष) २ , काँग्रेस ० आणि भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय खासदार शरद पवारांची नाराजी

News Desk

‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या, मग होऊन जाऊद्या आमने-सामने’, शिवसेना आमदाराचे वक्तव्य

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

News Desk