HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

लोकांना दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यात सरकार अपयशी !

यवतमाळ | “यवतमाळ जिल्हयात गेल्या ५ वर्षात एकही उद्योग आला नाही. राज्यातील महत्त्वाच्या कंपन्या बंद पडत आहेत. लोकांचा रोजगार जात आहे आणि गेलाही आहे. लोकांना सरकारने जे स्वप्न दाखवले ते स्वप्न पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत केला आहे. “सरकारने केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नुसत्या घोषणा केल्या आहेत”, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

“सरकारने कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु, आचारसंहिता लागल्यानंतर कुठली कामे पूर्ण करणार ?”, असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. “विधानसभेच्या मतदानापूर्वी अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडणार आहेत. भाजप शिवसेनेकडे जागाच शिल्लक नाही. भाजप शिवसेनेचे जुने लोक अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात आहे हे सांगता येणार नाही”, असे अजित पवार म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत आहे. यावर देखील अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “भुजबळ साहेबांबाबत अफवा पसरवली जात आहे. भुजबळ साहेबांनी याबाबत स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. वेगळाच मुद्दा आणून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकार करत आहे”, असे अजित पवार म्हणाले.

Related posts

लोकसभा निवडणुकीसाठी युपीमध्ये भाजप सज्ज

News Desk

गुलाम नबी आझाद यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा पाकिस्तानला फायदा !

News Desk

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार का ?

News Desk