HW News Marathi
Covid-19

राज्यात २८ जूनपासून सलून-पार्लर्स सुरु होणार, ‘हे’ नियम बंधनकारक

मुंबई | कोरोनाच्या देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अनेक गोष्टी आता पुन्हा सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी (२५ जून) राज्याच्या मंत्रिमंडळाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सर्व सामान्यांसाठी हा निश्चितच महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. राज्य शासनाने ‘मिशन बिगिन टप्पा ४’ची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लगेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

राज्यात सलून-पार्लर्स सुरु होणार, ‘या’ आहेत प्रमुख अटी

• केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येईल. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.

• दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.

• ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानांतील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.

• फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशा वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.

• उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलुन्स आणि ब्युटी पार्लस २८ जून २०२० पासून सुरु करता येतील. राज्यातील उर्वरित भागांमध्येसुध्दा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक! देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

News Desk

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

News Desk

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

News Desk