HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रक्रिया घटनाबाह्य! – राज्यपाल

मुंबई | विधानसभा अध्यक्ष पदाची निवड आवाजी मतदानने होण्याची निवडणूक करण्याची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात राज्यपालांनी महाविकासआघाडी सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे आता महाविकासाघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा वाद पाहायला मिळत आहे.  राज्यपालांच्या भूमिकेनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

 दरम्यान, यापूर्व मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले होते. आता तिसऱ्यांदा महाविकासआघाडी सरकार पत्र पाठवणार आहे. राज्यपालाच्या या भूमिकेमुळे आता हिवाळी अधिवेशनाचा उद्या (२७ डिसेंबर) आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष निवड होणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर महाविकासआघाडीमधील तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने काल (२६ डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या कार्यक्रम राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. महाविकासआघाडी सरकारने अध्यक्षाच्या निवडीच्या कार्यक्रमात केलेल्या बदलाबाबत राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेण्यास सांगितले आहे.

राऊतांचा राज्यपालांना टोला

“राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. त्यांना अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत लगावला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून राऊतांनी राज्यपालांवर टीका केली. राऊतांनी आज (२७ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र सोडले. राज्यपालांनी १२ आमदारांच्या शिफारशईला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपाल अभ्यास सुरू आहे. यात शांतता अभ्यास सुरू आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Related posts

नववी-दहावीत आता तोंडी परीक्षा नाही  

News Desk

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस!”, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

News Desk